Ruth 1

1मग असे झाले की शास्ते राज्य करत असता त्या देशात दुष्काळ पडला. आणि यहूदातील बेथलेहेम येथील कोणी एक माणूस आपली पत्नी व दोन पुत्रांसह मवाब देशी गेला. 2आणि त्या मनुष्याचे नाव अलीमलेख आणि त्याच्या पत्नीचे नाव नामी होते व त्याच्या दोन पुत्रांची नावे महलोन व खिल्लोन असून ती एफ्राथा यहूदातील बेथलेहेम येथील होती. ती मवाब देशी राहण्यास गेली.

3आणि नामीचा पती अलीमलेख मरण पावला आणि तिच्या दोन पुत्रांबरोबर ती मागे राहिली. 4आणि त्या दोघांनी दोन मवाबी स्त्रिया पत्नी म्हणून केल्या. एकीचे नाव अर्पा आणि दुसरीचे नाव रूथ होते, आणि ते तेथे जवळपास दहा वर्षे राहिले. 5मग महलोन व खिल्लोन मरण पावले. याप्रमाणे नामी आपला पती व दोन पुत्र यांच्यामागे एकटी राहिली.

6परमेश्वराने आपल्या लोकांस अन्न पुरविले आहे आणि मदत केली आहे हे तिने ऐकले तेव्हा आपल्या दोन्ही सुनांसह ती मवाब देशातून परत यहूदा देशात जाण्यास निघाली. 7आणि ती आपल्या दोन्ही सुनांसह राहत होती त्याठिकाणाहून परत यहूदा देशास जाण्यास निघाली.

8आणि नामी आपल्या दोन्ही सुनांस म्हणाली, तुम्ही दोघी आपआपल्या आईच्या घरी जा. तुम्ही जशी मृतांवरवर आणि माझ्यावर दया केली तशीच परमेश्वर तुमच्यावर करो. “ 9परमेश्वर करो आणि तुम्हाला दुसऱ्या पतीच्या घरी विसावा मिळो आणि तिने त्यांचे चुंबन घेतले व त्या मोठ्याने रडू लागल्या. 10आणि त्या तिला म्हणाल्या आम्ही तुझ्याबरोबर तुझ्या लोकांकडे येणार.

11नामी म्हणाली, माझ्या मुलींनो, परत जा, तुम्ही मजबरोबर का येता? माझ्या पोटी का आणखी पुत्र आहेत की ते तुमचे पती होतील? 12माझ्या मुलींनो माघारी जा. मी आता म्हातारी झाले आहे. पती करण्याचे माझे वय नाही. जर मला पती मिळण्याची आशा आहे असे मी म्हटले तरी व आज रात्रीच तो मिळाला आणि मला पुत्रही झाले, 13तरी ते मोठे होऊपर्यत तुम्ही त्यांची वाट पाहाल का? तुम्ही आता लग्न न करता पतीशिवाय राहाल का आणि त्याची वाट पहाल का? माझ्या मुलींनो, तुम्हाला होणाऱ्या दुःखासाठी मी फार दुःखी होत आहे, कारण परमेश्वराचा हात माझ्याविरूध्द फिरला आहे.

14आणि तिच्या सुना मोठा आवाज काढून आणि पुन्हा रडू लागल्या. अर्पाने आपल्या सासूचे चुंबन घेतले. परंतु रूथ तिला धरून राहिली.

15मग ती तिला म्हणाली, ऐक तुझी जाऊ आपल्या लोकांकडे व देवाकडे परत गेली आहे. तर तूही आपल्या जावेच्या मागून जा.

16आणि रूथ म्हणाली मला सोडून जा आणि माझ्यापासून दूर जा अस मला सांगू नका तुम्ही जिथे जाल तिथे मी येईल, तुम्ही जिथे राहाल तिथे मी राहील तुमचे लोक ते माझे लोक, तुमचा देव तो माझा देव. 17तुम्ही मराल तेथे मी मरेल व तिथेच मला पुरले जाईल. मरणाशिवाय कशानेही तुमचा माझा वियोग झाला तर परमेश्वर मला शिक्षा करो किंवा त्यापेक्षा अधिक करो. 18आणि रूथने आपल्याबरोबर जाण्याचा दृढनिश्चय केला आहे हे नामीने पाहिले तेव्हा तिने तिच्यासोबत वादविवाद करण्याचे थांबवले.

19मग त्या दोघी बेथलेहेमात चालत पोहचल्या. आणि बेथलेहेमात आल्यावर सर्व नगर त्याच्यासाठी खूप गलबलून गेले आणि स्त्रिया म्हणू लागल्या, हीच का ती नामी? 20आणि ती त्यांना म्हणाली, मला नामी (मनोरमा) म्हणू नका, तर मला मारा (दु:खदायक) म्हणा कारण सर्वसमर्थाने मला फारच क्लेशमय वागवले आहे. 21मी भरलेली गेले याप्रकारे परमेश्वराने मला रिकामी परत आणले, परमेश्वराने माझ्याविरूध्द साक्ष दिली आहे आणि त्या सर्वसमर्थाने मला दु:खीत केले आहे म्हणून तुम्ही मला नामी का म्हणता?

याप्रमाणे नामी आणि तिची मवाबी सून रूथ हिला घेऊन मवाब देशातून परत आली आणि त्या बेथलेहेमात आल्या तेव्हा सातूचा हंगामास आरंभ झाला होता.

22

Copyright information for MarULB